पीसीओडी/पीसीओएस
पीसीओडी/पीसीओएस
आतापर्यत मी माझ्या लेखांच्या माध्यमातून तुम्हाला बर्याच आजारांबद्दल महिती दिली आहे. जसे की, डिसमेनोरिया, पीएमएस, रजोनिवृत्ती, स्ट्रेस यूरीनरी इंन्कोटंन्स आणि यूरीनरी ट्राक्ट इन्फेक्शन आणि मला खात्री आहे की बर्याच स्त्रीयांपर्यंत ही माहिती पोहचली असेल व तुम्हाला आताच्या आजारांबद्दल पुरेसी माहिती मिळालेली आहे. आणि जर तुम्हाला या पैकी कोणतेही त्रास होत असेल तर होमियापॅथीक औषधांच्या मदतीने मी आहेच तुमचा हा त्रास बरा करायला.
आज एका खूप सामान्य आजारा बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. ती म्हणजे पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओवेरीयन डिसीज) (PolyCystic ovarian disease) हा आजार सामान्य जरी असला तरी तो वेगात वाढत चालला आहे. आणि पीसीओडी आजकाल बर्याच तरुण स्त्रीयांनमध्ये दिसून येत आहे. पीसीओडी चा त्रास लाईफस्टाईल डिसऑर्डर (Lifestyle Disorder) मुळे वाढत आहे.
आता लाईफस्टाईल डिस्ऑर्डर म्हणजे नक्की काय?
आजच्या या व्यस्त जगात स्त्रीयांचे राहणीमान खूप बदलेले आहे. सतत धावपळ, सतत डोक्यात विचार, सारखे स्ट्रेस घेणे, तरुण मुलींना सारखे बाहेरचे खाण्याची सवय (Junk food) रात्री उशीरा पर्यंत जागणे, व्यायाम न करणे व व्यसनाची सवय (दारु, सिगारेट) या सगळ्या गोष्टींमुळे शरीराला अतिताण मिळाला की, हार्मोन्स मध्ये गडबड चालू होते व या आजाराची सुरुवात होते या लाईस्टाईल डिसऑर्डर मुळे वजन सुध्दा अति प्रमाणात वाढते आणि पीसीओडी चा त्रास चालू होऊ शकतो. पीसीओडी मुळे काही स्त्रीयांनमध्ये वंधत्व (infertility) चा त्रास चालू होऊ शकतो, या सोबत हाय ब्लड प्रेषर, डायबिटीस सारखे आजार सुध्दा पीसीओडी असलेल्या स्त्रीयांमध्ये चालू होऊ शकतो. कधी कधी पीसीओडी चा त्रास जेनेटीक कारणामुळे सुध्दा होऊ शकतो म्हणजे आई मुळे मुलीला हा त्रास चालू होऊ शकतो. आता जाणूण घेऊ की, पीसीओडी मध्ये नक्की शरीरात काय बदल होतो व त्याची कुठली लक्षणे दिसून येतात.
पीसीओडी हा एक मल्टीसीस्टीम (multisystem) त्रास आहे की, ज्यामध्ये अनेक प्रकार ची लक्षणे दिसूण येतात, कारण अनेक हार्मोन्स शरीरात अनेक गोष्टी बॅलेन्स करतात आणि हार्मोनल इन्बॅलन्स झाला की, फक्त मासिक पाळी च्या त्रासा बरोबर अजून अनेक त्रास चालू होतात.
1. पीसीओडी चा त्रास चालू झाला तरी त्याची लक्षणे पाळी ची सुरुवात झाल्याच्या बर्याच वर्षांनी दिसूण येतात.
2.सगळ्यात आधी मासिक पाळीचे त्रास चालू होतात. ते म्हणजे 3 ते 6 महिनेे मासिक पाळी न येणे (Ammenorrhoe) किंवा पाळी जरी आली तरी पाळीचे रक्त कधी जास्त प्रमाणात वाहते, किंवा अगदीच कमी प्रमाणात वाहते. मासिक पाळी अनियमीत येते, (काही स्त्रीयांमध्ये 6 महिण्याच्या अंतराने, तर काही स्त्रीयांमध्ये 15 दिवसाच्या अंतराने सुध्दा येऊ शकते.)
3.अति प्रमाणात चेहर्या वर पूरळ येणे,
4. चेहर्या वर केस येणे, म्हणजे पुरुषांसारखी दाढी येणे याला हीरसूटीझम (Hirsutism) असे म्हणतात.
5. मानेच्या मागची त्वचा काळी पडणे किंवा काकेतली व स्तनाच्या खालची त्वचा काळी पडणे याला (Acanthosis Nigra) असे म्हणतात.
6. काही स्त्रीयांना थायरॉईड चा त्रास सुध्दा चालू होऊ शकतो.
7. केस अति प्रमाणात गळायचे चालू होते. व टक्कल पडण्याची शक्यता वाढते.
8.असे अनिवार्य नाही की, पीसीओडी मध्ये वजण नेहमी वाढतेच काही मुलींमध्ये वजण वाढण्याचे लक्षण दिसून येत नाही.
जरी पीसीओडी ची लक्षणे कमी असली, तरीही या आजारामुळे आपल्या शरीरावर बरेच नुकसान होऊ शकतात. पीसीओडी मध्ये फक्त शाररीक लक्षणे नसतात. तर बर्याच स्त्रीयांनमध्ये मानसिक लक्षणे सुध्दा दिसूण येतात. बर्याच स्त्रियांना याची जाणीव नसते परंतु काहीवेळा शारिरिक लक्षणांमुळे मानसिक लक्षणे चालू होऊ शकतात.
जसे की, आपल्याला माहिती आहे की, पीसीओडी चा त्रास 80 टक्के तरुण मुलींमध्ये चालू होतो आणि तरुण वयास मुली त्यांच्या सौंदर्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात. पण जसे आपण पाहिले की, पीसीओडी मध्ये चेहर्यावर अति प्रमाणात पूरळ येतात व चेहर्या वर पुरुषांसारखे केस/दाढी यायाची चालू होते आणि या कारणामुळे तरुण मुलींमध्ये (Low Sefl confidence/Low self esteem) चालू होतो. कोणत्या मुलीला तिच्या चेहर्यावर केस आलेले आवडतील?
आणि या कारणामुळे ते कौटुंबिक कार्य किंवा मित्रांसह बाहेर जाण्याचे टाळण्याचा प्रयत्न करतात. असे करत करत त्यांना एकटे वाटायला लागते व त्या डिप्रेशन मध्ये सुध्दा जाऊ शकतात. वजण प्रमाणापेक्षा जास्ती वाढल्यामुळे सुध्दा काही स्त्रीयांना त्याचा त्रास होऊ शकतो. पीसीओडी मध्ये हार्मोनल इन्बॅलन्स होतो. आणि हारर्मोन्स मुळे आपली मनोदशा व्यवस्थीत रहाते. आणि हारर्मोन्स मध्ये गडबड झाली की मनोदशा बिघडते, व मानसिक स्थीती वर परिणाम होतो, त्यामुळे काही मुलींना/स्त्रींयांना सतत नाराज वाटते, रडू येते, मुड सारखे बदलत राहते. पीसीओडी मुळे पीएमएस चा त्रास सुध्दा वाढू शकतो, पीसीओडी चा त्रास चालू झाला की, बर्याच मुलींना वंध्यत्व चा त्रास चालू होऊ शकतो व आपल्याला मुल होत नाही या गोष्टची काळजी त्यांना सतत लागलेली असते. किंवा आपल्याला भविष्यात मुल होणार की नाही या गोष्टी ची सुध्दा सतत चिंता असते, आणि अशा विचारांचा मनावर खूप परिणाम होतो व त्रास अजून वाढतो. असा हा पीसीओडी चा त्रास शरिरावर व मनावर परिणाम करतो.
विषेश टिपण्या
1. व्यायाम, योगा, मेडीटेशन करणे
2. बाहेरचे तेलकट, तूपट अन्न खाणे टाळणे
3. अति प्रमाणात वजण वाढले असतील तर ते कमी करणे, आणि यासाठी व्ययाम व डाएट गरजेचे आहे. आणि काही व्यसन असेल तर लगेच बंद करणे.
4. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे चालू करणे
5. होमीओपॅथीक औषधे सुध्दा या त्रासासाठी अती लाभदायक ठरली आहेत.
Comments
Post a Comment