यूरीनरी ट्राक्ट इन्फेक्शन /मुत्रमार्गातील संसर्ग
यूरीनरी ट्राक्ट इन्फेक्शन /मुत्रमार्गातील संसर्ग
आतपर्यंत मी डिसमेनोरिया, पीएमएस , रजोनिवृत्ती व स्ट्रेस युरीनरी इनकोटींनन्स या विषयांवर तुम्हाला माहिती दिली. हे लेख लिहिण्याचा माझा उद्देश असा आहे की, सगळ्या महिलांना आपल्या शरीरात काय बदल होतात, कोणत्या त्रासामुळे शरीरावर काय दुष्परीनाम होतात व तो त्रास कमी करण्यासाठी काय केले पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घेतला पाहिजे हे आहे.
आज आपण यूरीनरी ट्राक्ट इन्फेक्शन या विषयाबद्दल जाणूण घेऊ. हा त्रास पुरुष व स्त्री या दोघांनाही होऊ शकतो, पण स्त्रीयांमध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. कारण पुरुषांपेक्षा स्त्रीयांचा मुत्रमार्ग लहान असतो. बॅक्टेरियाला एखाद्या महिलेच्या मुत्रालयात जाण्यासाठी आणि संसर्गासाठी फार दुर प्रवास करण्याची गरज नसते, आणि त्यामुळे स्त्रीयांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात दिसतो. युरीनरी ट्राक्अ इंन्फेक्शन होण्याची बरीच कारणे आहेत.
1. पहिले कारण म्हणजे अस्वच्छता, युरीनची जागा स्वच्छ न करणे, जागा स्वच्छ नाही ठेवली तरी बॅक्टेरीयाचे प्रमाण वाढते व इंन्फेक्शन चा त्रास चालू होतो.
2. दुसरे कारण म्हणजे जर संडासाच्या जागेवर इंन्फेक्शन असेल तर ते यूरीन च्या जागेपर्यंत सुध्दा पोहचू शकते कारण यूरीन व संडासाच्या जागेमध्ये अंतर कमी असते.
3. किडनी स्टोन मुळे सुध्दा इंन्फेक्शन वाढू शकते कारण स्टोनमुळे यूरीन ला मुत्रमार्गातून निघायला त्रास होतो आणि त्यामुळे ती साठूण राहते आणि इंन्फेक्शन वाढते.
4. सारखे-सारखे युरीन खूप वेळासाठी नियंत्रणात ठेवली व लगेच लागल्या लागल्या केली नाही तर इंन्फेक्शन होऊ शकते.
5. सेक्स केल्यानंतर सुध्दा हा त्रास स्त्रींयान मध्ये चालू होऊ शकतो, जर पुरुषाला अधीपासून युरीनरी ट्राक्अ इंन्फेक्शन चा त्रास असेल तर
6. रजोनिवृत्ती (menopause) च्यावेळी सुध्दा हा त्रास बर्याच स्त्रीयांमध्ये चालू होऊ शकतो.
7. प्रेग्नसीच्या वेळेस सुध्दा यूटीआय चा त्रास चालू होऊ शकतो, पण खूप कमी प्रमाणात होतो.
8. पाळी नंतर किंवा मासिक पाळीच्या दरम्याण सुध्दा याचा त्रास होऊ शकतो, कारण मासिक पाळीच्या वेळेस नीट स्वच्छता नाही ठेवली तर यूरीन इंन्फेक्शन होऊ शकते.
युरीनरी ट्राक्ट इंन्फेक्शन का होते व त्याची काय कारणे आहे हे आपण पाहिले, आता नक्की त्याची लक्षणे काय आहेत हे जाणूण घेऊ.
1. कधी-कधी इन्फेक्शन झाले असेल, तरी काही लक्षणे दिसूण येत नाहीत.
2. लघवी करण्याचा जोरदार, सतत आग्रह
3. लघवी करताना
वारंवार जळजळ, अल्प प्रमाणात लघवी होणे.
4. ढगाळ दिसणारे मूत्र
5. मुत्र जर लाल, चमकदार गुलाबी किंवा काळ्या रंगाचे होत असेल तर मूत्रात रक्ताचे चिन्ह आहे असे समजावे
6. तीव्र गंधयुक्त मूत्र
7.जर इन्फेक्शन किडनी पर्यंत पोहचले तर ताप, थंडी वाजून येणे, मळ-मळ उलट्या होणे या सारखी लक्षणे सुध्दा दिसून येऊ शकतात.
माझा आजचा लेख लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे जागरुकता निर्माण करणे आहे. आणि आपल्याला ही समस्या टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली जाऊ शकते याबद्दल सांगणे आहे. तर आता जाणून घेऊ की हा त्रास कसा टाळला जाऊ शकतो.
1. पाणी पीने- दिवसांतून किमान 3-4 लिटर पाणी पीलेच पाहिजे. जास्त पाणी पिल्यामुळे सतत लघवी लागते व ती स्वच्छ होते आणि सगळे बॅक्टरीया लघवी बरोबर निघून जातात.
2. संडासाची जागा धुताना नेहमी पुढून मागे धुणे म्हणजे हात नेहमी धूताना पुढून मागे (from front to back) असे केल्यावर जर संडासाच्या जागेवर इन्फेक्शन असेल तर ते युरीन च्या जागेपर्यंत पोहचणार नाही. बर्याच स्त्रीयांना याबद्दल कल्पना नसते, पण हे इन्फेकॅशन चे सगळ्यात महत्वाचे कारण आहे त्यामुळे नेहमी पूढून मागे धुणे
3. सेक्स केल्यानंतर लगेच लघवी करणे आणि एक ग्लास पाणी पीने असे केल्यावर सगळे बॅक्टेरीया लघवी बरोबर निघूण जातात, व इन्फेक्शन होण्याचे प्रमाण कमी होते.
4. एक खूप महत्वाची गोष्ट जी आतापर्यंत बर्याच स्त्रीयांना माहिती नाही,ती म्हणजे मासिक पाळी च्या वेळेस दर 4-5 तासांनी पॅड (Pad) बदलने खूप आवश्यक आहे. काही स्त्रीया फक्त एकच पॅड दिवसभर घालूण ठेवतात आणि यामुळे इन्फेक्शन चे प्रमाण वाढते. रक्त जरी कमी वाहत असेल तरी 4-5 तासांनी पॅड बदलेच पाहिजे, असे केल्याने यूरीनरी ट्राक्ट इन्फेक्शन व अजून बरेच इन्फेक्शन आपण टाळू शकतो.
6. लघवीच्या जागेवर पावडर वापरणे थांबवा कारण यामुळे जळजळ होऊ शकते, किंवा कोणतेही केमीकल असलेले प्रोडक्ट टाळले पाहिजेत. हा त्रास तुम्हाला सतत होत असेल तर त्यावर तुम्ही होमियापॅथीक उचार सुध्दा चालू करु शकता.
-Dr.Rutuja Khanore
Comments
Post a Comment